Home नाशिक धक्कादायक! बांधकाम व्यावसायिकाला मागितली 10 लाखांची खंडणी

धक्कादायक! बांधकाम व्यावसायिकाला मागितली 10 लाखांची खंडणी

Breaking News | Nashik Crime: बांधकाम व्यावसायिकाला फ्लॅट विक्री करायचे असतील तर १० लाख रुपयांची खंडणीची मागणी करणार्या संशयिताने शिवीगाळ करीत साईट बंद पाडण्याचीही धमकी.

Extortion of 10 lakhs was demanded from the builder

नाशिक : नाशिकरोड परिसरातील बांधकाम व्यावसायिकाला फ्लॅट विक्री करायचे असतील तर १० लाख रुपयांची खंडणीची मागणी करणार्या संशयिताने शिवीगाळ करीत साईट बंद पाडण्याचीही धमकी दिली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, या घटनेमुळे नाशिकरोड परिसरातील बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

बांधकाम व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकी दिल्याच्या प्रकाराने नाशिकरोड परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. किशोर भारती असे खंडणीची मागणी करणार्या संशयिताचे नाव आहे. प्रमोद बाळकृष्ण गोरे (रा. शिखरेवाडी, नाशिकरोड) या बांधकाम व्यावसायिकाच्या फिर्यादीनुसार, त्यांची मालधक्का परिसरामध्ये नवीन बांधकाम साईटचे काम सुरू आहे. रविवारी (ता. २१) सकाळी ते बांधकाम साईटच्या ऑफिसमध्ये बसलेले असताना संशयित किशोर भारती त्याठिकाणी आला. त्याने, इमारतीतील फ्लॅट विकायचे असतील तर आम्हाला १० लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल अशी धमकी दिली. त्यानंतर संशयित भारती पुन्हा सायंकाळी कार्यालयात आला आणि पुन्हा खंडणीची धमकी देत, खंडणी दिली नाही तर बांधकाम साईट बंद पाडण्याची धमकी देत शिवीगाळ केली.

या घटनेमुळे बांधकाम व्यावसायिक गोरे यांनी नाशिकरोड पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. त्यानुसार, संशयिताविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक बिडकर हे तपास करीत आहेत.

Web Title: Extortion of 10 lakhs was demanded from the builder

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here