Home Accident News वऱ्हाड लग्नाला निघालेलं, भरधाव स्कॉर्पिओ अचानक उलटली; दोघांचा मृत्यू, ६ जखमी

वऱ्हाड लग्नाला निघालेलं, भरधाव स्कॉर्पिओ अचानक उलटली; दोघांचा मृत्यू, ६ जखमी

Breaking News | Nagpur Accident: भीषण अपघाताची घटना, लग्नसमारंभाला जाणारी भरधाव स्कॉर्पिओ उभ्या कारवर आदळून उलटल्याने एक दाम्पत्य ठार.

bridegroom leaves for the wedding, the dashing Scorpio suddenly reverses; Both died

नागपूर : लग्नसमारंभाला जाणारी भरधाव स्कॉर्पिओ उभ्या कारवर आदळून उलटल्याने एक दाम्पत्य ठार झाल्याची घटना घडली आहे.  एकाच कुटुंबातील पाच जणांसह, स्कॉर्पिओ चालक असे सहा जण जखमी झाले आहेत. रविवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास बुटीबोरी परिसरात ही घटना घडली.

राजेश मुरारीलाल श्रीवास्तव (वय ५२) आणि पूजा राजेश श्रीवास्तव (वय ४५, दोन्ही रा. रामनगर, वर्धा) अशी मृतकांची नावं आहेत. जखमींमध्ये राणी श्रीवास्तव (वय ६३), अमन श्रीवास्तव (वय २६), संगीता श्रीवास्तव (वय ४८), राकेश श्रीवास्तव (वय ५२ सर्व रा. रामनगर, वर्धा) आणि चालक सारंग गोल्हर (वय २६ रा. धामणगाव – वाठोडा) याचा समावेश आहे. जखमींवर बुटीबोरीतील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

श्रीवास्तव कुटुंब नागपुरातील लग्नसमारंभासाठी एमएच-४०-बीई-३१९१ या क्रमांकाच्या कारने वर्ध्याहून निघाले होते. स्कॉर्पिओचा वेग अधिक होता. बुटीबोरीतील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. स्कॉर्पिओ रोडच्या बाजूला उभ्या असलेल्या एमएच-२९-एके-६१८६ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर आदळून उलटली. यात पती – पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर चालकासह सहा जण जखमी झाले आहेत.

या  अपघातानंतर नागरिकांची एकच गर्दी जमली होती. माहिती मिळताच बुटीबोरी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयामध्ये दाखल केले. याप्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: bridegroom leaves for the wedding, the dashing Scorpio suddenly reverses; Both died

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here