Home अहमदनगर अहमदनगर: कांदा झाकायला गेलेल्या मायलेकराचा वीज पडून मृत्यू 

अहमदनगर: कांदा झाकायला गेलेल्या मायलेकराचा वीज पडून मृत्यू 

Breaking News | Ahmednagar: कांदा झाकण्यासाठी गेलेल्या मायलेकराच्या अंगावर वीज पडून दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची घटना.

Mylekara, who went to cover onions, died due to lightning

श्रीगोंदा : तालुक्यातील यवती येथे शेतात कांदा झाकण्यासाठी गेलेल्या मायलेकराच्या अंगावर वीज पडून दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची घटना  सोमवारी (दि.२२) सायंकाळी पाच वाजता घडली. मीना बाजीराव आढाव (वय ४५) व नवनाथ बाजीराव आढाव (वय २४) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने यवती गावात शोककळा पसरली आहे.

आढाव कुटुंबीयांची सर्वसाधारण परिस्थिती आहे. मीना व बाजीराव यांनी दुसऱ्यांच्या शेतावर मोलमजुरी करून मुलगा नवनाथ याला शिकविले होते. त्याने बीएस्सी अॅग्रीची पदवी संपादन केली होती. आई-मुलाचा असा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शासनाने आढाव कुटुंबीयांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. श्रीगोंदा तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून अवकाळी पाऊस व वादळ होत आहे.

Web Title: Mylekara, who went to cover onions, died due to lightning

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here