Home क्राईम अनैतिक संबंधाच्या संशयातून मुसळाचा घाव घालून पत्नीचा खून

अनैतिक संबंधाच्या संशयातून मुसळाचा घाव घालून पत्नीचा खून

Nashik: बायकोचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून नवऱ्याने विवाहितेच्या डोक्यात मुसळाचा जोरदार प्रहार करून ठार (Murder) मारल्याची घटना.

Murder of Wife with pestle wound on Suspicion of an immoral relationship

नाशिक: बायकोचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून नवऱ्याने विवाहितेच्या डोक्यात मुसळाचा जोरदार प्रहार करून ठार मारल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर बायकोचा अपघात झाल्याचा बनाव रचून नवऱ्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत खुनाचे पुरावे नष्ट केल्याचे तपासात समोर आले आहे. विवाहितेचा पती संशयित मच्छिंद्र भगवान चौरे याच्यासह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मूळ बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील रहिवासी असलेला संशयित मच्छिंद्र भगवान चौरे याचा टेलरिंग व्यवसाय आहे. तो पत्नी नंदा, मुलगा मयुरेश, मुलगी अंकिता व भाचा सुरेश कराड यांच्यासमवेत श्रीरामनगरमधील संतकृपा अपार्टमेंट येथे वास्तव्यास आहे. त्याची बायको नंदा मच्छिंद्र चौरे हिच्या चारित्र्यावर संशय घेत अनैतिक संबंधाच्या संशयातून तिच्यासोबत वाद घातला.

Web Title: Murder of Wife with pestle wound on Suspicion of an immoral relationship

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here