Home नांदेड पोषण आहाराच्या खिचडीत शिजली चक्क पाल, २१ बालके रुग्णालयात दाखल

पोषण आहाराच्या खिचडीत शिजली चक्क पाल, २१ बालके रुग्णालयात दाखल

पहिलीतील विद्यार्थिनीला खिचडीत मृत अवस्थेतील पाल आढळली, बहुतांश विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ पोटदुखीचा त्रास जाणवू लागला.

Cooked Chickpeas in nutritional food khichdi

मारतळा |नांदेड : लोहा तालुक्यातील वाळकी बुद्रुक येथील जि. प. प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहारातील खिचडीत पहिलीतील विद्यार्थिनीला खिचडीत मृत अवस्थेतील पाल आढळली. दरम्यान, ही खिचडी शाळेतील १२२ विद्यार्थ्यांनी खाल्ली होती. त्यातील बहुतांश विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे २१ विद्यार्थ्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कापसी बुद्रुक येथे दाखल केले होते.

जि.प.प्रा.शाळेत शालेय पोषण आहाराची खिचडी वाटप करण्यात आली. आजचा मेनू हरभरा डाळ व खिचडी होती. ही खिचडी काही विद्यार्थ्यांनी शाळेतच खाल्ली तर काही जणांनी घरी डब्यात भरून घरी घेऊन जाऊन खाल्ली. त्यातील पहिलीत शिक्षण घेणारी आरुषी बेटकर या विद्यार्थिनीला खिचडीत मृत पाल आढळली. तिचे वडील शिवशंकर बेटकर हे घरीच असल्याने त्यांनी ही मृत पाल मुख्याध्यापक, शिक्षकांच्या निदर्शनास आणून दिली. थोड्याच वेळात त्यातील खिचडी खालेल्या काही विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ, पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे चिमुकले रडू लागले. त्यातील २१ विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी कापशी बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. के. मुनेश्वर व सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू केले. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. आरोग्य विभागाचे पथक शाळेत येऊन उर्वरित विद्यार्थ्यांवर उपचार करीत आहे.

Web Title: Cooked Chickpeas in nutritional food khichdi

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here