Home अकोले भंडारदरा धरण निम्मे भरले तर पिंपळगाव खांड ओव्हरफ्लो, वाकी तलावही ….

भंडारदरा धरण निम्मे भरले तर पिंपळगाव खांड ओव्हरफ्लो, वाकी तलावही ….

Bhandardara Dam Update: भंडारदरा धरण पाणलोटात पाच दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने अपेक्षेप्रमाणे काल शनिवारी सकाळी निम्मे भरले. काल शनिवारी सकाळी 11039 दलघफू क्षमतेच्या या धरणातील पाणीसाठा 5641 दलघफू (51.10 टक्के) झाला.

Bhandardara Dam Update half and Pimpalgaon Khand overflow

भंडारदरा: उत्तर नगर जिल्ह्याचे जिवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात पाच दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने अपेक्षेप्रमाणे काल शनिवारी सकाळी निम्मे भरले. काल शनिवारी सकाळी 11039 दलघफू क्षमतेच्या या धरणातील पाणीसाठा 5641 दलघफू (51.10 टक्के) झाला होता. तर सायंकाळी साठा 5657 दलघफू (51.40 टक्के) होता.

भंडारदरातही पावसाचा जोर टिकून असल्याने 112 दलघफू क्षमतेचा वाकी तलावातील पाणीसाठा निम्मा होणार आहे. काल सायंकाळी या तलावातील पाणीसाठा 54.52 दलघफू (48.57 टक्के) झाला होता.

घाटघर आणि रतनवाडीत अधूनमधून धो-धो पाऊस कोसळत असल्याने या भागातील धबधबे आक्राळविक्राळ रूप धारण करू लागले आहेत. ओढे-नाले भरभरून वाहत आहेत. पाणलोट धुक्यांनी लेपाटून गेला असून भात खाचरांमध्ये आता पाणी साचू लागले आहे. संततधार सुरू असल्याने वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. या परिसरात काल सकाळपर्यंत नोंदवलेल्या आकडेवारीनुसार साडेसहा ते सात इंच पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे गत 24 तासांत धरणात नव्याने 368 दलघफू पाणी दाखल झाले. आतापर्यंत सर्वाधिक पाणी नव्याने आले आहे. निळवंडेतही नव्याने पाणी येत आहे.

काल सकाळपर्यंत संपलेल्या 24 तासांत नोंदवला गेलेला पाऊस असा- (मिमी) भंडारदरा 145, घाटघर162, रतनवाडी 165, वाकी 129.

अकोले तालुक्यातील मुळा पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने मुळा नदीवरील अंबित पाठोपाठ आता पिंपळगाव खांड धरण भरले असून आता हे पाणी मुळा धरणाच्या दिशेने झेपावले आहे.

मुळा नदीवरील 193 दशलक्ष घनफूट क्षमतेचे आंबित धरण तीन दिवसापूर्वी भरले. त्यानंतर काल शनिवारी दुपारी 3.15 वाजता 600 दशलक्ष घनफूट साठवण क्षमतेचे पिंपळगाव खांड धरण ओव्हरफ्लो झाले. या वर्षीच्या पावसाळ्यात अकोलेतील हे दुसरे धरण भरले आहे. पिंपळगाव खांड धरणातील पाणीसाठा आता राहुरी तालुक्यातील मुळा धरणाकडे झेपावले आहे. यामुळे शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Bhandardara Dam Update half and Pimpalgaon Khand overflow

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here