Home महाराष्ट्र नाशिक-पुणे महामार्गावर स्कूल बस आणि शिवशाहीचा विचित्र अपघात, शिवशाही बसचा पत्रा उडाला...

नाशिक-पुणे महामार्गावर स्कूल बस आणि शिवशाहीचा विचित्र अपघात, शिवशाही बसचा पत्रा उडाला अन…

Nashik Pune Highway Bus Accident: नाशिक-पुणे महामार्गावर चंदनपुरे येथे एसटी महामंडळाची शिवशाही बस आणि स्कूल बसचा अपघात.

Nashik Pune Highway Bus Accident

शनिवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गावर बुलढाण्यात एका खासगी बसला भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात बसने पेट घेतल्यामुळे २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना ताजी असताना नाशिक-पुणे महामार्गावर शिवशाही बस आणि स्कूल बसचा विचित्र अपघात झाल्याचे समोर आले आहे.  स्कूल बसमधून अनेक लहान मुलं प्रवास करत होती. सुदैवाने कोणताही अनर्थ घडला नाही.

नाशिक-पुणे महामार्गावर चंदनपुरे येथे एसटी महामंडळाची शिवशाही बस आणि स्कूल बसचा अपघात झाला. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. पुण्याहून नाशिककडे जाणाऱ्या शिवशाही बसचा पत्रा उडून स्कूल बसवर आदळला. यामुळे मोठा अपघात होता होता राहिला आहे. विशेष म्हणजे अपघातावेळी स्कूल बसमध्ये अनेक लहान मुलं प्रवास करत होते. या घटनेची अधिक चौकशी महामार्ग पोलीस करत आहेत.

Web Title: Nashik Pune Highway Bus Accident

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here