वाहनावर झाड कोसळून दोन पोलिस ठार, तीन कर्मचारी गंभीर जखमी
Jalgaon Accident: गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाच्या वाहनावर भलेमोठे चिंचेचे जिर्ण झाड कोसळल्याने दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू तर तीन कर्मचारी गंभीर जखमी.
जळगाव: जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाच्या वाहनावर भलेमोठे चिंचेचे जिर्ण झाड कोसळल्याने दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू तर तीन कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. कासोदा-एरंडोल दरम्यान अंजनी प्रकल्पाच्या कालव्याजवळ पावणे नऊच्या सुमारास ही घटना घडली
याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेचे तपासपथक शासकीय वाहनाने (एमएच.१९.एम.७५१) कासोद्याकडून एरंडोलकडे येत असताना गुरुवारी(ता.२९) रात्री पावणे नऊच्या दरम्यान भलेमोठे चिंचेचे झाड या पोलिस वाहनावर कोसळले. यात वाहनातील दोघे दाबले जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे कर्मचारी जखमी झाले आहेत.
अपघात घडला त्यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील हे त्यांच्या वाहनाने जवखेडा (ता. एरंडोल) येथे घरी जात होते, मात्र घटना पाहून त्यांनी तत्काळ एरंडोल पोलिसांना अपघाताची माहिती दिली. पोलिस निरीक्षक संतोष बारोडे, सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे यांच्यासह पोलिस कर्मचारी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. उपनगराध्यक्ष कुणाल महाजन व ग्रामस्थांनी जखमींना तातडीने बाहेर काढून खासगी वाहनाने जळगावला रवाना केले.
पोलिसांच्या वाहनातील सहाय्यक फौजदार भरत जेठवे, नीलेश सूर्यवंशी आणि चंद्रकांत शिंदे अशा तिघांना रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तातडीचे उपचार सुरू करण्यात आले असून घटनेचे वृत्त कळताच वरीष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेत चौकशी केली.
पोलिस वाहनावर पडलेले चिंचेचे झाड प्रचंड वजनी आणि भले मोठे असल्याने त्यात पोलिस वाहनाचा पूर्णतः चुराडा झाला. दोन कर्मचारी दबले गेल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी तातडीने क्रेन मागवण्यात आली.
Web Title: Two policemen were killed and three employees were seriously injured Tree fell Accident
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App