Home Accident News बस अपघातातील २५ मृत्यूंवर संजय राऊतांची प्रतिक्रिया, समृद्धी महामार्ग शापित आहे, कारण…

बस अपघातातील २५ मृत्यूंवर संजय राऊतांची प्रतिक्रिया, समृद्धी महामार्ग शापित आहे, कारण…

Samruddhi Highway Bus Accident:  बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातानंतर लागलेल्या आगीत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया.

Sanjay Raut reacts to 25 deaths in bus accident, Samriddhi Highway 

नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाताना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा येथे हा अपघात झाला. यावर शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. समृद्धी महामार्गाला अनेकांचे शाप लागले आहेत. त्यामुळे तो शापित महामार्ग आहे, असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं. ते शनिवारी (१ जुलै) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

प्रवासी बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या बसमध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळ येथील प्रवासी होती. विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस होती. बस सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या दुभाजकाला धडकली आणि बसने पेट घेतला. या घटनेत २५ प्रवाशांचा मृत्यू झाला.

संजय राऊत म्हणाले, “समृद्धी महामार्ग शापित महामार्ग झाला आहे. तो शापित का झाला याच्या खोलात जावं लागेल. तो महामार्ग बनवण्यासाठी सरकारने मनमानी केली. याबाबत अनेक गोष्टी आहेत. त्या भविष्यात समोर येतील, पण दुर्दैवाने त्या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत, वारंवार मृत्यू होत आहेत. हे काही चांगलं नाही.”

“कितीवेळा श्रद्धांजल्या वाहायच्या. आम्ही अनेकदा समृद्धी महामार्गावरील वेगमर्यादेची मागणी केली आहे. त्याविषयी काहीच होत नाही. तो रस्ता भ्रष्टाचारातून तयार झाला आहे. त्या रस्त्यासाठी अनेकांच्या जमिनी हडप करण्यात आल्या. जबरदस्तीने जमिनी घेण्यात आल्या. त्या रस्त्याला अनेकांचे शाप आहेत आणि त्या रस्त्यात मला अनेकांचे अश्रू दिसत आहेत,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

Web Title: Sanjay Raut reacts to 25 deaths in bus accident, Samriddhi Highway 

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here