LPG चे नवे दर जाहीर, महागला का स्वस्त झाला? किती रुपयांना मिळणार घरगुती अन् व्यावसायिक सिलेंडर?
LPG Cylinder Price 1 July Update: घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती स्थिरच.
LPG Cylinder Price: आज जुलै महिन्याचा पहिला दिवस. आज 1 जुलैपासून एलपीजी सिलेंडरचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, 14.2 किलो एलपीजी सिलेंडर आणि 19 किलो कमर्शियल सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच, या महिन्यात घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती स्थिरच आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून एलपीजीच्या किमतींत कोणताही बदल झालेला नाही. मार्चमध्ये एलपीजी सिलिंडरमध्ये 50 रुपयांची वाढ झाली होती. तसेच, त्याआधी गेल्या वर्षी 6 जुलै रोजी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल करण्यात आला होता. देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत मार्चपर्यंत 1053 रुपये होती, त्यात 50 रुपयांनी वाढ झाली होती आणि आता घरगुती सिलेंडर 1103 रुपये प्रति सिलेंडर विकला जात आहे.
देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये स्वयंपाकघरातील वापरासाठी एलपीजी सिलेंडरची किंमत 1103 रुपये आणि व्यावसायिक वापराच्या सिलेंडरची किंमत 1773 रुपये आहे. याशिवाय देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत एलपीजी सिलेंडरची किंमत 1102.50 रुपये आणि व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1725 रुपयांवर कायम आहे. कोलकातामध्ये (Kolkata) एलपीजी सिलेंडरची किंमत 1129 रुपयांवर स्थिर आहे. तर व्यावसायिक वापराच्या सिलेंडरची किंमत 1875.50 रुपये आहे. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, चेन्नईमध्ये एक एलपीजी सिलेंडर 1118.50 रुपयांवर आहे, तर व्यावसायिक सिलेंडर 1937 रुपयांना विकला जात आहे.
Web Title: LPG Cylinder Price 1 July Update
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App