विळ्याने वार करत मुलाने केली सावत्र आईची हत्या, कारण ऐकून व्हाल थक्क
Murder Case: आपल्या सावत्र आई यांच्याशी शेतीच्या कारणावरून वाद झाला. या वादातून विळ्याने गळ्यावर व चेहऱ्यावर वार केले. गंभीर दुखापत झाल्याने सावत्र आईचा जागीच मृत्यू झाल्याची घटना.
वैजापूर: वैजापूर तालुक्यातील अगरसायगाव येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. सावत्र मुलाने आईचा खून केल्याची खळबळजनक घटना सकाळी 11.30 वाजेच्य सुमारास घडली. आशाबाई घमाजी जाधव (वय 48) असे या मृत आईचे नाव असून, नानासाहेब घमाजी जाधव (वय 33) असे खून करणाऱ्या सावत्र मुलाचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नानासाहेब यांचा आपल्या सावत्र आई आशाबाई यांच्याशी शेतीच्या कारणावरून वाद झाला होता. या वादातून नानासाहेब याने शनिवार (दि 1) रोजी सकाळी 11.30 वाजेचा सुमारास विळ्याने गळ्यावर व चेहऱ्यावर वार केले. गंभीर दुखापत झाल्याने आशाबाई यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत आरडा ओरडा झाल्याने परिसरातील नागरिक त्या ठिकाणी धावत आले. त्यांना नानासाहेब याने आपल्या सावत्र आईचा खून केल्याचे बघितले. नागरिकांना बघताच नानासाहेब याने शेतातील विहिरीकडे पळ काढत विहिरीत उडी घेत जीवन यात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी त्याला बाहेर काढत घटनेची माहिती वैजापूर पोलीसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय लोहकरे, उपनिरीक्षक पाटील, उपनिरीक्ष रज्जाक शेख, ज्ञानेश्वर शिंदे, भगवान सिंगल, पवार, गणेश पठारे, आय बाईक पथकाचे जोणवाल गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले व घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविचछेदनासाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. या प्रकरणी पुढील तपास वैजापूर पोलीस करीत आहे.
Web Title: Son Murder stepmother with Sickle
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App