Home क्राईम Murder: तरुणाची हत्या करुन मृतदेह पाण्याच्या टाकीत फेकला

Murder: तरुणाची हत्या करुन मृतदेह पाण्याच्या टाकीत फेकला

Yavatamal Crime: बेपत्ता असलेल्या एका इसमाची निर्घृण हत्या (Murder)  करण्यात आल्याची घटना.

Murder the youth and threw the body in the water tank

यवतमाळ: बेपत्ता असलेल्या एका इसमाची निर्घृण हत्या केली त्यांनतर मृतदेह अर्धवट बांधकाम असलेल्या जुन्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत  फेकला. यवतमाळ  जिल्ह्यातील दारव्हा मार्गावरील चेतना वाईन बारच्या मागे लोहारा परिसरात ही घटना उघडकीस आली. विजय दामोधर टोळे (राहणार गिलानी नगर यवतमाळ) असं मृताचं नाव आहे.

मारेकरी आणि मृत एका ठिकाणी 10 मे रोजी रात्री सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले. त्यानंतर मारेकरी मृत विजय यांना दुचाकीवर घेऊन गेले. याप्रकरणी मृत विजय टोळे यांच्या नातेवाईकांनी अवधूतवाडी पोलिसात ते बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांकडून शोध सुरु असतानाच शुक्रवारी (12 मे) दोन जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्यानंतर दोघांचीही असून चौकशी केली तेव्हा त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.

विजय टोळे यांना जीवे मारुन दारव्हा मार्गावरील चेतना वाईन बारच्या मागील अर्धवट बांधकाम असलेल्या एका अपार्टमेंटच्या पाणीच्या टाक्यात फेकून दिल्याची कबुली आरोपींनी दिली. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा पोलिसांना मृत विजय टोळे यांचा मृतदेह पाण्याच्या टाकीमध्ये पाण्यात तरंगताना आढळून आला.

Web Title: Murder the youth and threw the body in the water tank

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here