Home क्राईम पुणे हादरलं! बसमध्ये ओळख, धमक्या अन् लॉजवर नेत केला वारंवार लैंगिक अत्याचार

पुणे हादरलं! बसमध्ये ओळख, धमक्या अन् लॉजवर नेत केला वारंवार लैंगिक अत्याचार

Pune Crime: अल्पवयीन मुलीला मारण्याची आणि तिचं कॉलेज बंद करण्याची वारंवार धमकी देत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना.

Identification, threats and repeated sexual abused led to the lodge on the bus

पुणे:   एक संतापजनक आणि धक्कादायक घटना मार्केटयार्ड परिसरात घडली आहे. अल्पवयीन मुलीला मारण्याची आणि तिचं कॉलेज बंद करण्याची वारंवार धमकी देत तिच्यावर बलात्कार केला आहे. या प्रकरणी एका 21वर्षीय नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त होत आहे.

या प्रकरणी अल्पवयीन मुलीने मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अभिजीत दिलीप पापळ (वय 21, रा. अप्पर इंदिरानगर, पुणे) या नराधमाला अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी ही मार्केटयार्ड परिसरात राहते. ती एका नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेते. कॉलेजला जाण्यासाठी ती बसचा वापर करत होती. याच प्रवासादरम्यान दोघांची ओळख झाली होती. याच ओळखीचा आरोपीने गैरफायदा घेतला आणि तिला धमकी द्यायला सुरुवात केली. तिच्यावर वारंवार बलात्कार केला. डिसेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान हा सगळा प्रकार घडला आहे.

भूगाव येथील एका लॉजवर घेऊन जात अभिजीत पापळ याने अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत लैंगिक संबंध प्रस्तापित केले. त्यानंतर याविषयी कुठे वाच्यता केल्यास किंवा कोणाला काहीही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी देखील दिली. या सगळ्या प्रकारामुळे मुलगी ही पोलिसांत तक्रार देण्यास घाबरत होती.अखेर हिम्मत करून तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी मार्केटयार्ड पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title:Identification, threats and repeated sexual abused led to the lodge on the bus

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here