Home नांदेड भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडले, २ तरुणांचा जागीच मृत्यू, लग्नाहून परतताना

भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडले, २ तरुणांचा जागीच मृत्यू, लग्नाहून परतताना

Nanded:  दुर्देवी अपघाताची (Accident) घटना, भोकर येथ लग्न आटोपून घराकडे परतताना भोकर – नांदेड मार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन तरुणाचा जागीच मृत्यू.

Accident speeding truck crushes a two-wheeler, 2 youths die on the spot

नांदेड: नांदेडमधून एका दुर्देवी अपघाताची घटना समोर आली आहे. भोकर येथ लग्न आटोपून घराकडे परतताना भोकर – नांदेड मार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  गुरूवार (११, मे) नांदेड शहरातील चौपाळा भागातील पंचशील नगर येथील संदीप गौतम काळे आणि राहुल बाबुराव कोलते हे दोघेजण आपली बुलेट क्रमांक एम एच 26 बी झेड 2036 वरून आज लग्नासाठी भोकर येथे गेले होते. यावेळी लग्न आटोपून दोघेही त्यांच्या घराकडे जात होते.

सहा वाजता पेट्रोल पंपा नजीक कन्हैया स्वीट मार्टच्या समोर (RJ14 GP 4757) क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्यांच्या बुलेटला जोराची धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की बुलेट फरफटत गेली. त्यामुळे दोन्ही तरुण ट्रकच्या चाकाखाली आले. या धक्कादायक घटनेत दोन्ही तरुणांचा दुर्देवी मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Accident speeding truck crushes a two-wheeler, 2 youths die on the spot

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here