Home क्राईम Murder: धक्कादायक: महिलेची हत्या करून मृतदेह कॅरीबॅगमध्‍ये भरून पुलाखाली फेकला

Murder: धक्कादायक: महिलेची हत्या करून मृतदेह कॅरीबॅगमध्‍ये भरून पुलाखाली फेकला

Murder: महिलेची हत्या करून मृतदेह कॅरीबॅगमध्‍ये भरून पुलाखाली फेकला, अद्याप संबंधीत महिलेची ओळख पटलेली नाही.

Murder woman, the body was stuffed in a carry bag and thrown under the bridge

मुक्ताईनगर: जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेची क्रूरपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्या करून मृतदेह कॅरीबॅगमध्‍ये भरून पुलाखाली फेकलेला आढळून आला. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मुक्ताईनगर बर्‍हाणपूर महामार्गावरील कुंड गावाजवळील पुलाच्या खालील बाजूस आज सकाळी महिलेचा मृतदेह आढळून आला. महिलेचा मृतदेह (Dead body)  हा जाड प्लॅस्टीकच्या कॅरीबॅग्जमध्ये भरून टाकल्याचे आढळून आले. अद्याप संबंधीत महिलेची ओळख पटलेली नाही.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचले. पुलाच्या खालील बाजूस असलेला मृतदेह वर काढण्यात येत असून या प्रकरणी पोलिसांकडून पंचनामा सुरू आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात खूनाच्या सातत्याने घटना घडत आहेत. यात जळगाव शहरासह यावल तालुक्यात दोन, चाळीसगावमध्‍ये एक खून झाला आहे. या पाठोपाठ आता मुक्ताईनगर तालुक्यात हत्या झाल्याने परिसराला हादरा बसला आहे.

Web Title: Murder woman, the body was stuffed in a carry bag and thrown under the bridge

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here