Rape Case: लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
Ahmednagar Rape Case: घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन महिलेवर अत्याचार.
अहमदनगर: लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी तोफखाना ठाण्यात प्रमोद नीळकंठ शिरसाठ (वय ६०, रा. संजयनगर, औरंगाबाद) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. उपनगरात राहणाऱ्या पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.
फिर्यादीच्या पतीचे निधन झाले आहे. शिरसाठ याच्यासोबत त्यांची ओळख होती. तो जानेवारी २०२० मध्ये पुतण्याची लग्नपत्रिका घेऊन फिर्यादी महिलेच्या घरी आला होता. त्या दिवशी पाऊस असल्यामुळे त्याने फिर्यादीच्या घरी मुक्काम केला. घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन फिर्यादीवर अत्याचार केला. बदनामी होऊ नये, म्हणून महिलेने याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर शिरसाठ याने लग्नाचे आमिष दाखवले. पण, नंतर लग्नास टाळाटाळ करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
Web Title: Rape Case Abuse of a woman by luring her into marriage