Home अकोले अकोले निंदनीय घटना: मतीमंद मुलीवर बलात्कार, आरोपीस अटक- Rape

अकोले निंदनीय घटना: मतीमंद मुलीवर बलात्कार, आरोपीस अटक- Rape

Akole Rape Case: अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील घटना, घरात घुसून मतीमंद मुलीवर बलात्कार, आरोपीस अटक करण्यात आली आहे.

Mentally retarded girl rape, accused arrested

अकोले: तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील मतिमंद मुलीवर अत्याचार (Sexual abused) केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. अकोले पोलिसांनी आरोपीच्या काही क्षणातच मुसक्या आवळल्या आहेत.  दिलीप विठ्ठल पवार उर्फ पप्पु असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पिडित ३६ वर्षीय मुलगी ही आई वडिल शेतात मजुरीच्या कामाला गेलेले असल्याने घरी एकटीच होती. या परिस्थितीचा फायदा घेत रविवारी दुपारी आरोपी दिलीप विठ्ठल पवार उर्फ पप्पु याने घरात घुसून दरवाजा लावून तिच्यावर बलात्कार (Rape) केला असल्याची घटना घडली.

याबाबत पिडितीचे नातेवाईक महिलेने अकोले पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, पिडिता हि ३६ वर्षिय मतिमंद मुलगी असुन तिला बोलता येत नाही. ती जन्मतःच मतिमंद आहे. रविवारी (दि. २८ ऑगस्ट) दुपारी तिचे आई वडिल शेतात मजुरीच्या कामावर गेलेले असताना घरातून तिचा ओरडण्याचा आवाज येत होता. हा आवाज कसला व कुठून येतोय हे त्या महिलेने पाहण्याचा प्रयत्न केला. दरम्यान हा आवाज घरातून येत असल्याचे समजल्यानंतर या नातेवाईक महिलेने मुलाला सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली. मुलाला मागील दरवाज्याजवळ पाठवून त्यांनी पुढच्या दरवाजाला जाऊन जोराचा धक्का दिला. दरम्यान दरवाजा उघडल्यानंतर घरात आरोपी दिलीप विठ्ठल पवार उर्फ पप्पु हा पिडित मतिमंद मुलीवर अत्याचार करत असल्याचे दिसून आले. यावेळी त्याला पकडले असता तो माझ्याकडून चूक झाली पुन्हा होणार नाही असे म्हणत हाताला धक्का देवून पळून गेला. पिडिता भयभीत असल्याने तिला उपचारासाठी अकोले ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: Mentally retarded girl rape, accused arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here