Home Maharashtra News Eknath Shinde: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं ट्विट, म्हणाले ‘शाब्बास एकनाथजी…..

Eknath Shinde: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं ट्विट, म्हणाले ‘शाब्बास एकनाथजी…..

Narayan Rane tweet about Eknath shinde

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाराज झाले असून त्यांनी बंड पुकारला आहे. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह सूरतमध्ये आहेत. शिंदे यांच्या नाराजीनंतर महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे.

महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले असतानाच भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. राणे यांनी ट्विट करत या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता.’ असं ट्विट राणे यांनी केले आहे.

दरम्यान ठाकरे सरकार अडचणीत आले आहे. संध्याकाळी एकनाथ शिंदे पाच आमदारासह भाजप नेते अमित शहा यांच्याशी चर्चा करणार आहे. एकनाथ शिंदे याचं लक्ष उद्धव ठाकरे यांच्या वर्षा यांच्या बैठकीवर लागून राहिले आहे.  सेनेचे दोन आमदार सुरतकडे रवाना झाले आहे. गायब झालेले आमदार सूरतमध्ये आहे.

Web Title: Narayan Rane tweet about Eknath shinde

Previous articleAccident: वारकऱ्यांच्या ट्रकला भीषण अपघात, एक ठार चार जखमी
Next articleRape | मतीमंद तरुणीवर बलात्कार, गर्भवती असल्याने सहा महिन्यांनी प्रकार उघडकीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here