Home पुणे Rape | मतीमंद तरुणीवर बलात्कार, गर्भवती असल्याने सहा महिन्यांनी प्रकार उघडकीस

Rape | मतीमंद तरुणीवर बलात्कार, गर्भवती असल्याने सहा महिन्यांनी प्रकार उघडकीस

Pune Crime Rape of a mentally retarded girl

Pune Crime | पुणे: तरुणीच्या मतीमंदपणाचा गैरफायदा घेत तिच्यावर बलात्कार (Rape) करणाऱ्या आरोपीस मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे. शंकर अंकुश ताकमोगे वय ५८ कवडे रस्ता घोरपडी असे अटक केलेल्या नराधम आरोपीचे नाव आहे.

याबाबत पिडीत तरुणीच्या आईने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिडीत तरुणी मतीमंद आहे. तिची आई एका सोसायटीत रखवालदार आहे. सोसायटीने त्यांना राहण्यास जागा दिली. आरोपी ताकमोगे याने मतीमंद मुलीला घरात बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला. आई वडिलांना मारून टाकण्याची धमकी देण्यात आली होती. डिसेंबरमध्ये हा प्रकार घडला होता. मतीमंद तरुणी सहा महिन्याची गर्भवती असल्याचे लक्षात आल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस उपनिरीक्षक भोसले याबाबत अधिक तपास करीत आहे.

Web Title: Pune Crime Rape of a mentally retarded girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here