Home अकोले ब्रेकिंग: अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीने तीन भाजप पदाधिकारी फोडले

ब्रेकिंग: अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीने तीन भाजप पदाधिकारी फोडले

Ahmednagar district, NCP fired three BJP office bearers

Ahmednagar | अहमदनगर: उप मुख्यमंत्री मा.अजित दादा यांच्या उपस्थितीत अकोले तालुक्यातील भाजपचे नेते तथा माजी जि.प. अर्थ व बांधकाम सभापती श्री.कैलासराव वाघचौरे, भाजपचे ज्येष्ठ नेते श्री.वसंतराव मानकर, नगर तालुक्यातील माजी जि.प. सदस्य श्री. बाळासाहेब हराळ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात पक्षात प्रवेश केला आहे. असे ट्वीट मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी आज अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा कार्यक्रम पूर्वनियोजित असला तरी सध्याच्या राजकीय घडामोडीत लक्षवेधक ठरला आहे.

नगर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब हराळ, अकोले तालुक्यातील कैलास वाकचौंरे व वसंतराव मनकर यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एकीकडे भाजपकडून विधान परिषदेच्या निकालानंतरचा जल्लोष सुरू आहे.

यावेळी नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे, माजी आमदार राहुल जगताप, घनःश्याम शेलार, सीताराम गायकर, अशोक भांगरे, कपिल पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके उपस्थित होते. भाजपचे ज्येष्ठ नेते विखे पाटील आणि मधुकर पिचड यांचे हे कार्यकर्ते असल्याने त्या दोघांनाही हा धक्का मनला जात आहे.

Web Title: Ahmednagar district, NCP fired three BJP office bearers

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here