Home संगमनेर नाशिक पदवीधर निवडणूक : तांबे यांच्यासाठी विविध संघटना सरसावल्या

नाशिक पदवीधर निवडणूक : तांबे यांच्यासाठी विविध संघटना सरसावल्या

Nashik Graduate Election| Satyajeet Tambe: निवडून आल्यानंतर शिक्षक, संस्थाचालक आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यावर भर देण्यात येईल. या संधीचे आपण नक्कीच सोने करू. – सत्यजित तांबे

Nashik Graduate Election Various organizations mobilized for Tambe

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या सत्यजित अपक्ष उमेदवारी केल्यानंतर विविध शिक्षक संघटनांनी त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटना ( MUST), महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनांनी सत्यजित यांना संधी देण्याचे आवाहन पत्राद्वारे केले आहे.

विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणूकीत सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी केली आहे. महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटना आणि महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेने सत्यजित तांबे यांना पाठिंबा दर्शवत त्याबाबतचे पत्रही त्यांनी सत्यजित तांबे यांना दिले आहे. महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेने सत्यजित तांबे यांना पाठिंबा दर्शवत त्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, उच्चशिक्षित सत्यजित तांबे यांच्या रूपाने पदवीधरांना आशेचा किरण दिसत आहे. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीने शिक्षण क्षेत्राशी निगडीत विधान परिषद निवडणुकीच्यात शिक्षक भारती, महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनासह समाजातील विविध घटकांनी दिलेला पाठिंबा खूपच महत्त्वाचा आहे. हा क्षण मी कधीही विसरणार नाही. विविध संघटनांच्या पाठबळामुळे आगामी काळात लढण्याची मोठी ताकद मिळाली आहे. आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केलेल्या कार्याचा वारसा पुढेही चालू ठेवण्याचा प्रयत्न या निमित्त राहणार आहे. सोबतच शिक्षण क्षेत्रात काम करण्याची मोठी संधीदेखील यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे. निवडून आल्यानंतर शिक्षक, संस्थाचालक आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यावर भर देण्यात येईल. या संधीचे आपण नक्कीच सोने करू. – सत्यजित तांबे, उमेदवार

उच्चशिक्षित उमेदवाराला न्याय द्या

केवळ राजकारणच नव्हे तर समाजकारणातही नेहमी पुढे राहणाऱ्या, उच्चशिक्षित सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीच्या रूपाने नाशिक विभागातील पदवीधरांना शिक्षणक्षेत्राच्या उज्वल भविष्याबाबत आशेचा किरण दिसत आहे. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीने शिक्षण क्षेत्राशी निगडीत समस्या सुटण्यास या निमित्त मोठि मदतच होणार आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद भूषविताना उत्तर महाराष्ट्रातील युवकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत. आगामी काळातही त्यांची विकासाची भूमीका कायम राहणार आहे. त्यासाठी त्यांना पदवीधर मतदार संघासाठी संधी मिळावी.

– मनीष गावंडे, महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटना,

पद नसतांनाही उत्तर महाराष्ट्रातील युवकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठीही सातत्य ठेवणाऱ्या सत्यजित तांबे यांनी प्रश्न मार्गी लावतांना तरुण वर्गाला सोबत ठेवल्याचे संघटनेच्या पत्रात नमुद करण्यात आले आहे. युवानेता अशी ओळख असलेल्या सत्यजित तांबे यांनी पाचही जिल्ह्याशी जोडलेले नाते लक्षात घेता आगामी दिवसात अन्य संघटनाही त्यांच्या सोबत राहतील असा विश्वास दोन्ही शिक्षक संघटनांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Nashik Graduate Election Various organizations mobilized for Tambe

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here