Home महाराष्ट्र खळबळजनक: पतीसोबत भांडण झाले अन पत्नीने पोटच्या दोन लेकरांना विहिरीत फेकले

खळबळजनक: पतीसोबत भांडण झाले अन पत्नीने पोटच्या दोन लेकरांना विहिरीत फेकले

Nanded Crime news: पतीसोबत वाद झाल्यानंतर पत्नीने रागाच्या भरात पोटच्या दोन चिमुकल्यांचा खून.

quarrel with the husband and the wife threw the two stomachs into the well

नांदेड:  नांदेड जिल्ह्याला हादरवणारी घटना  घडली आहे. नवऱ्यासोबत वाद झाल्यानंतर पत्नीने रागाच्या भरात पोटच्या दोन चिमुकल्यांचा खून केला आहे. यामध्ये एका चार महिन्याच्या चिमुकलीचा समावेश होता. तेलंगणा सीमावर्ती भागातल्या देगलूर तालुक्यातील हाणेगावपासून जवळच असलेल्या गुत्ती तांडा येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे.  या प्रकारामुळे नांदेड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत.

नांदेड जिल्ह्यात ह्रदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.  ज्यात पतीसोबत हैदराबादला जाण्याच्या आग्रहावरुन झालेल्या वादात पत्नीने दोन पोटच्या गोळ्यांना संपवलं. यामध्ये तीन वर्षांच्या मुलाचा आणि चार महिन्याच्या चिमुकलीचा समावेश आहे. दोन मुलांना संपवल्याच्या हृदयद्रावक घटनेमुळे नांदेडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेली माहिती अशी की,  गुत्ती तांडा येथील संतोष आडे आणि पूजा आडे या दाम्पत्याचा. तीन महिन्याचा सिद्धार्थ आणि चार महिन्याची फुंदी यांच्यासह त्यांचा सुखी संसार सुरु होता. संतोष आडे हा हैदराबादमध्ये एका खासगी कंपनीत काम करतो. संतोष आडे मकर संक्रातीला गावी आला होता. त्यावेळी पूजानं हैदराबादला घेऊन चला असा आग्रह धरला होता. संतोष यानं याला विरोध दर्शवला.  आपण अद्याप तिथं सेटलं झालो नाही.. मुलगीही खूप लहान आहे. थोड्या दिवसानंतर आपण जाऊ अशी समजूत बायकोला घालण्याचा प्रयत्न संतोषनं केला. पण पूजा काही केल्या ऐकायला तयार नव्हती. यावरुन या दाम्पत्यामध्ये संक्रातीच्या सणाच्या वेळी कडाक्याचं भांडण झालं. 

Web Title: quarrel with the husband and the wife threw the two stomachs into the well

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here