Home महाराष्ट्र Nawab Malik Arrested:  नवाब मलिक यांना अटक पण…

Nawab Malik Arrested:  नवाब मलिक यांना अटक पण…

Nawab Malik Arrested by ED

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीकडून अटक (Nawab Malik Arrested by ED) करण्यात आली आहे. नवाब मलिक यांची तब्बल सात तास चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर नवाब मलिक ईडीच्या कार्यालयाबाहेर पडले. त्यावेळी नवाब मलिक यांच्या चेहऱ्यावर हसू होते. नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर जे.जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे. पण नवाब मलिक यांनी ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर आपण पुढच्या लढाईसाठी तयार असल्याचे दाखवून दिले. यानंतर नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याचाही प्रयत्न केला. लढेंगे और जितेंगे, असे त्यांनी यावेळी म्हटले.

वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर थोड्याच वेळात नवाब मलिक यांना मुंबई सेशन्स कोर्टात हजर केले जाईल. याठिकाणी दोन्ही बाजूच्या वकिलांकडून युक्तिवाद केला जाईल. त्यामुळे ईडी (ED) नवाब मलिक यांच्या किती दिवसांच्या कोठडीची मागणी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Nawab Malik Arrested by ED

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here