Home अहमदनगर अहमदनगर: महिलेचा विनयभंग, आरोपीस अटक

अहमदनगर: महिलेचा विनयभंग, आरोपीस अटक

Karjat Crime Accused arrested for molesting woman

कर्जत | Karjat Crime: कर्जत शहरातील एका महिलेच्या शेजारी येऊन लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने महिलेच्या विनयभंग (molesting woman) प्रकरणी संशियीतास कर्जत पोलिसांनी तपास करीत अटक केली आहे. पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. 17 फेब्रुवारी रोजी पीडित महिला आपल्या राहत्या घराच्या पडवीमध्ये रात्री आपल्या पतीसोबत झोपली असताना त्यांच्याच घरापाठीमागे राहत असलेला संशयित आरोपी याने रात्री 11 वाजता या महिलेच्या शेजारी येऊन त्याने वाईट हेतूने तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही तासांतच दोषारोपपत्र दाखल करण्याची कामगिरी केली.

कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल होताच आरोपीस काही तासांतच गजाआड केल्याची कामगिरी केली असून सखोल तपास करून आरोपीच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे.

वाचा: Ahmednagar News

उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पो. हवा. सुनील माळशिखरे, पोलीस नाईक बी. जी. यमगर, पो.हे.कॉ.एम. जी. काळे, विकास चंदन आदींनी ही कारवाई केली आहे.

Web Title: Karjat Crime Accused arrested for molesting woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here