Home अहमदनगर संगमनेर: बायकोच्या मैत्रिणीचा खून करणाऱ्या आरोपीला अटक

संगमनेर: बायकोच्या मैत्रिणीचा खून करणाऱ्या आरोपीला अटक

Sangamner Accused arrested for murder wife's girlfriend

Sangamner Murder Case | संगमनेर: बायकोच्या मैत्रिणीचा खून करून पाच वर्षापासून फरार असलेला आरोपीला पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील विखरणी येथून मंगळवारी ताब्यात घेतले आहे. संगमनेर उप विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

तकदीर उर्फ संदीप हरिसिंग तामचिकर रा. घुलेवाडी ता. संगमनेर असे या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी विखरणी येथे असल्याची माहिती उप विभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना समजली होती. त्यांच्या पथकातील पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर, फुरकान शेख, कॉन्स्टेबल अमृत आढाव सुभाष बोडखे, गणेश शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

२०१७ मध्ये घराशेजारी राहणाऱ्या एका महिलेच्या खुनाचा आरोप त्याच्यावर आहे. महिलेचा खून झाल्यानंतर तो पसार होता.  गुप्त माहितीनुसार तो विखरणी येथे असल्याचे पोलिसांना समजल्यावर त्याला तेथून ताब्यात घेतले आहे.    

Web Title: Sangamner Accused arrested for murder wife’s girlfriend

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here