Home अहमदनगर १० वी १२ वी च्या प्रश्नपत्रिका जळून खाक, चंदनापुरी घाटात द बर्निंग...

१० वी १२ वी च्या प्रश्नपत्रिका जळून खाक, चंदनापुरी घाटात द बर्निंग टेम्पो

 

Sangamner Accident Burning Tempo in Chandanapuri Ghat

Sangamner Accident | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात टेम्पोला भीषण आग लागल्याने ड बर्निंग टेम्पोचा थरार वाहनचालकांनी अनुभवला. आज पहाटे ही घटना घडली.  महामार्ग पोलिसांनी धाव घेत टेम्पो विझाविण्य्साठी प्रयत्न सुरु आहेत.

हा टेम्पो भोपाळ  वरून पुण्याकडे दहावी व बारावीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जात होता. महामार्ग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात महामार्गावर हॉटेल साई प्रसादच्या समोर टेम्पो क्रमांक एम.पी.३६ एच. ०७९५ हा पुण्याकडे जात असताना अचानक पाठीमागे पेट घेतला. मागील बाजूस आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आल्यावर त्यांनी टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा केला.  चालक मनीष चौराषीय व रामविलास राजपूत यांनी टेम्पो बाजूला घेत आग विझविण्याचे काम सुरु केले. या आगीत कोणही जखमी झाले नाही. वाहतूक जुन्या घाटातून सुरु आहे.

या टेम्पोतून मध्यप्रदेशातील भोपाळ ( MP) येथून पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका नेण्यात येत असल्याचे समजले असून या सर्व प्रश्नपत्रिका खाक झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच शिक्षणाधिकारी घटनास्थळी पोहोचले आहे.

Web Title: Sangamner Accident Burning Tempo in Chandanapuri Ghat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here