Home अहमदनगर विजेच्या धक्क्याने आदिवासी तरुणाचा मृत्यू, महावितरणाचा गलथान कारभार

विजेच्या धक्क्याने आदिवासी तरुणाचा मृत्यू, महावितरणाचा गलथान कारभार

Accident Death of a tribal youth due to electric shock

Ahmednagar Accident | अहमदनगर:  नगर तालुक्यातील पिंपळगाव तलावात मंगळवारी मासेमारी करण्यासाठी तलावात उतरलेल्या तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपळगाव तलावाच्या कडेला आदिवासी भिल्ल समाजाची मोठी वस्ती आहे. येथील आदिवासी समाज पिंपळगाव तलावात मासेमारी करत आपली उपजीविका करत आहे. मच्छिंद्र कचरू बर्डे वय १६ हा तरुण मासेमारी करण्यासाठी तलावात उतरताच येथे सुरु असलेल्या विद्युत पंपात करंट उतरल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

वाचा: Ahmednagar News

या घटनेची माहिती समजताच आदिवासी समाजाने मोठ्या संखेने तलावाकडे धाब घेतली.यावेळी आदिवासी समाज आक्रमक झाला होता. अवैध विद्युत पंप चालविणारे तसेच महानगरपालिकेचे होत असलेले दुर्लक्ष, महावितरण कंपनीचा गलथान कारभार याबाबत आदिवासी समाजाने नाराजी व्यक्त करत मृतदेह ताब्यात घेण्यास विरोध केला होता. महावितरण कंपनीच्या त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.  

Web Title: Accident Death of a tribal youth due to electric shock

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here