Home अहमदनगर अंघोळ करीत असताना अल्पवयीन मुलीचे मोबाईलमध्ये चित्रिकरण करणार्‍या तरुणावर गुन्हा

अंघोळ करीत असताना अल्पवयीन मुलीचे मोबाईलमध्ये चित्रिकरण करणार्‍या तरुणावर गुन्हा

Crime against a young man who filmed a minor girl in a mobile 

अहमदनगर | Ahmednagar Crime: अहमदनगर शहरातून धक्कादायक वृत्त समोर आले आहे. अल्पवयीन मुलगी अंघोळ करीत असताना तिचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करणाऱ्या तरूणाविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अजरूद्दीन अरिफ बेग (रा. संजीवनी हॉस्पिटलच्या शेजारी, माणकेश्वरगल्ली, अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.  याबाबत पीडित अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे.

पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सुमारे एक महिन्यापूर्वी मी घरातील बाथरूममध्ये अंघोळ करीत असताना खिडकीतून कशाचा तरी आवाज आल्याने मी खिडकीकडे पाहिले तेव्हा अजरूद्दीन बेग हा खिडकीमध्ये त्याचा मोबाईल ठेवून मी अंघोळ करत असल्याचे चित्रिकरण करत होता. त्याचा हा प्रकार पाहून मी त्याला ओरडले असता तो त्याचा मोबाईल फोन घेऊन पळून गेला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

वाचा: Ahmednagar News

हा प्रकार आई-वडिलांना सांगितला असता वडिलांनी मला व माझ्या आईला शांत राहण्यास सांगितले. यानंतर आई-वडिलांमध्ये वाद झाला. आम्ही मामाकडे राहण्यासाठी गेलो. वडिलांच्या भितीपोटी फिर्याद देण्यासाठी आले नसल्याचेही पीडित अल्पवयीन मुलीने फिर्यादीत म्हटले आहे. एक महिन्यानंतर पीडिताने सोमवारी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.

Web Title: Crime against a young man who filmed a minor girl in a mobile 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here