Home अहमदनगर अहमदनगर: तरुणाने केले अल्पवयीन मुलीचे अपहरण

अहमदनगर: तरुणाने केले अल्पवयीन मुलीचे अपहरण

Young man Abduction minor girl

Ahmednagar | राहुरी | Rahuri: राहुरी तालुक्यात अगोदरच मुलींच्या अपहरण घटना वाढल्या आहेत. यातच आणखी एक मुलगी घरात कोणाला काही न सांगता बेपत्ता झाली आहे. १९ फेब्रुवारी ही घटना घडली असून या घटनेने खळबळ उडाली आहे. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून शुभम पवार या तरूणाने तिचे अपहरण (Abduction) करून पळवून नेल्याचा गुन्हा राहुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

खडांबे परिसरात एक 16 वर्षे 8 महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी तिच्या कुटूंबासह राहते. सध्या त्या मुलीचे कुटुंब दुसर्‍या गावी राहते. ती अल्पवयीन मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत काही दिवसांपूर्वीच खडांबे येथे आली होती. दि.19 फेब्रुवारी रोजी त्या मुलीचे आई-वडील बाहेर गेले होते. तेव्हा ती मुलगी तिच्या आजीसोबत घरात होती. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास दोन तरूण मोटरसायकलवर आले अन तेव्हा ती मुलगी घरात कोणाला काही एक न सांगता बाहेर निघून गेली. घरच्यांनी मुलीचा शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही.

मुलीच्या आई-वडिलांनी शुभम पवार या तरूणाच्या घरी देहरे येथे जाऊन शोध घेतला असता तो पण गायब असल्याचे लक्षात आले. त्यानेच आपल्या मुलीला अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याचा संशय आल्यावर मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलिसात धाव घेत फिर्याद दाखल केली.  

त्यानुसार संशयित आरोपी शुभम पवार राहणार करांडे वस्ती, देहरे, ता. नगर तसेच आणखी एक अनोळखी तरूण अशा दोघाजणांवर मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक फौजदार बर्‍हाटे हे करीत आहेत.

Web Title: Young man Abduction minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here