नवाब मालिकांना दणका: न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला
मुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या न्यायालयीन 18 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दोन आठवडे आणखी मुक्काम वाढला आहे. त्यामुळे मलिक यांना रमजान काळात देखील कोठडीत राहावं लागणार आहे. नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. दाऊद गँगशी संबंधित व्यक्तिकडे जमीन खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
आज मलिक यांची कोठडी संपल्याने त्यांना विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी दोन्ही बाजूने युक्तीवाद झाला. त्यानंतर कोर्टाने मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी कोर्टाने मलिक यांना तुरुंगात खुर्ची, बेड आणि अंथरुण देण्यास परवानगी दिली आहे. या आधी प्रकृती बिघडल्याने मलिक यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते.
23 फेब्रुवारी रोजी ईडीने अटक (Arrest) केली होती. त्यानंतर त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी करण्यात आली असता त्यांना 7 मार्चपर्यंत कोठडी सुनावली होती. आता 18 एप्रिलपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
Web Title: Nawab Malik hit Court stay extended