Suicide: इंजिनिअर तरुणाची आत्महत्या, प्रेमपत्रामुळे खळबळ
औरंगाबाद | Aurangabad: पैठण तालुक्यातील पिंपळवाडी परिसरातील एका २५ वर्षीय इंजिनियरिंगचे शिक्षण घेतलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. निखिल दत्तात्रय चौडांळे ( रा. आदर्शनगर, पिंपळवाडी, ता. पैठण) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी की,, निखिल मूळचा पंढरपूर येथील असून तो इंजिनियरिंगचे शिक्षण घेत होता. त्याला पैठण एमआयडीसी येथील एका कंपनीत इंजिनिअर या पदावर नोकरी लागली होती. त्यामुळे सध्या तो पिंपळवाडी येथील आदर्शनगरमध्ये राहत होता. निखिलने उचलेल्या टोकाच्या पाऊलामुळे त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
निखिलने आत्महत्या केलेल्या खोलीत पोलिसांना काही प्रेमपत्र सापडली आहेत. एका प्रेमपत्रात ‘तेरे बिन नहीं जीना मर जाना ढोलना’ असे हिंदी चित्रपटातील गाण्याचे बोल लिहिण्यात आले आहेत. पोलिसांनी सर्व पत्रे ताब्यात घेतली आहेत. तसेच नातेवाईक आल्यानंतर या तरुणाने आत्महत्या का केली ? कोणाबरोबर त्याचे प्रेमसंबंध होते का? या प्रश्नाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
Web Title: Engineer young man’s suicide, excitement over love letter