Home Maharashtra News Breaking: नवाब मलिक यांची प्रकृती गंभीर, रुग्णालयात दाखल

Breaking: नवाब मलिक यांची प्रकृती गंभीर, रुग्णालयात दाखल

Nawab Malik in critical condition, hospitalized

मुंबई:  राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik)यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती नवाब मलिक यांच्या वकिलांनी विशेष पीएमएलए कोर्टात दिली असून आज त्यांना स्ट्रेचरवरून जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मलिक तीन दिवसांपासून खूप आजारी असल्याची वकिलांनी मलिक यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याची मागणी केली.

फरार गुंड दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या कारवायांशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात ईडीने फेब्रुवारीमध्ये मलिकला मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींनुसार अटक करण्यात आली  होती.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या वकिलाने विशेष न्यायालयाला माहिती दिली आहे की, मलिक गेल्या 3 दिवसांपासून आजारी आहेत आणि आता त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांना व्हीलचेअर/स्ट्रेचरवरून नेण्यात आले आहे. ६२ वर्षीय मलिक यांनी यापूर्वी न्यायालयाला सांगितले होते की, किडनीच्या आजारामुळे ते आजारी आहेत आणि पायांना सूज आली आहे.

याआधी शुक्रवारी, सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका स्वीकारण्यास नकार दिला होता. तर पीएमएलए न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी ६ मे पर्यंत वाढविण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्याअंतर्गत उच्च न्यायालयाने त्यांच्या तात्काळ सुटकेचा अंतरिम अर्ज फेटाळण्यात आला होता. ईडी मलिक यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

Web Title: Nawab Malik in critical condition, hospitalized

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here