Home महाराष्ट्र मोठी बातमी: भारताच्या नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, देशभरात जल्लोष

मोठी बातमी: भारताच्या नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, देशभरात जल्लोष

Draupadi Murmu President of India: देशाच्या राष्ट्रपती पदी द्रौपदी मुर्मू विराजमान.

NDA candidate Draupadi Murmu wins in presidential election 2022

नवी दिल्ली: राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. यामध्ये एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला आहे. नव्या राष्ट्रपती पदी द्रौपदी मुर्मू या विराजमान झाल्या आहेत. आदिवासी समाजातील पहिल्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांची निवड झाल्याने देशभरात जल्लोष साजरा केला जात आहे.

आज राष्ट्रपतिपदासाठीच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली. मतमोजणी दरम्यान मुर्मू आघाडीवर असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. मुर्मू यांच्या विरुद्ध विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा निवडणुकीत उतरले होते. द्रौपदी मुर्मू यांना ५४० हून अधिक मतं मिळाली आहेत. तर विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना २०४ मतं मिळाली आहेत. भाजपने द्रौपदी मुर्मू यांची उमेदवारी जाहीर केल्यापासूनच त्यांची चर्चा देशभर सुरू होती.

Web Title: NDA candidate Draupadi Murmu wins in presidential election 2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here