Accident: ऊस वाहतुकीच्या ट्रेलरला कारची धडक
नेवासा | Accident: नेवासा तालुक्यातील चांदा घोडेगाव रस्त्यावर चांदेकर वस्तीसमोर उस वाहतूक करणाऱ्या ट्रेलरला कारने पाठीमागून धडक दिल्याने अपघात (Accident) घडला. हा अपघात शनिवारी सकाळी ९:३० वाजता घडला. या अपघातात चार जण जखमी झाले आहे.
चालक विजू नामदेव गवळी वय ३५, शुभम पोपट गवळी वय २५, अलका पोपट गवळी वय ४५ सर्व रा. चांदा ता. नेवासा, रितेश विश्वासू वय ३५ रा. रा. वैजापूर अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
शनिवारी रात्रीच्या सुमारास मुळा कारखान्याकडे एक ट्रक्टर डबल ट्रेलरमधून ऊस घेऊन चालला होता. कार चालकास पुढील ट्रेलरचा अंदाज न आल्याने कारने ट्रेलरला पाठीमागील बाजूस धडक दिली. यामध्ये चार जण जखमी झाले. जखमी झालेले एकमेकांचे नातेवाईक होते. ते चांदा येथून घोडेगाव येथे एका आजारी असलेल्या लहान मुलाला भेटण्यास चालले होते. जखमी झालेल्या चौघांना नगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महत्वाचे: संगमनेर अकोले न्यूज नवीन सुपर फास्ट स्वरूपात आजच आपला अॅप येथून अपडेट करा. संगमनेर अकोले न्यूज
अपघात झालेल्या ट्रेलरला कोणतेही रीफ्लेक्टर, इंडिकेटर, रेड लेबल असे काही नव्हते. यामुळे पाठीमागून येणाऱ्या कारला लक्षात न आल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
Web Title: Nevasa Accident Car hit a sugarcane transport trailer