Rape: विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्यास शिक्षा
पुणे: लग्नाचे आमिष दाखवून एका शाळकरी मुलीस शाळेतून पळवून नेत तिच्याशी जबरीने शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी सत्र न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांनी आरोप्स २० वर्ष सक्तमजुरी व आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली आहे. हा प्रकार पाच वर्षापूर्वी घडला होता. याबाबत डेक्कन पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करणयात आला होता.
राकेश हिरामण चव्हाण वय २४ रा. कर्वेनगर असे आरोपीचे नाव आहे. पिडीत मुलगी पुण्यातील नळथांबा चौक परिसरात शाळेत शिकत असताना तिला राकेश याने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार (Rape)केला. या गुन्ह्याचा तपास पीएसआय शिल्पा लांबे, पोलीस नाईक नलिनी क्षीरसागर यांनी सबळ पुरावे गोळा करत २०१६ मध्ये दोषारोपपत्र दाखल केले होते. पंचानी सर्व साक्षीदारांचे जबाब नोंदवत पुराव्यांची खातरजमा करीत आरोपीस दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे.
Web Title: Rape Case Punishment for abusing a student