Home संगमनेर संगमनेर तालुक्यात महिलेला आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार

संगमनेर तालुक्यात महिलेला आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार

संगमनेर(News): शहरातील एका ३८ वर्षीय महिलेचा साधे सरळपणाचा गैरफायदा घेत तिला आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सुनील रामभाऊ कानवडे यांच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादीनुसार शहरातील एका ३८ वर्षीय महिलेसोबत निमगाव पागा येथील सुनील रामभाऊ कानवडे याने ओळख वाढवून तिच्या साधेपणाचा गैरफायदा घेत त्याने जानेवारी २०१८ ते २ फेब्रुवारी २०२० पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन सदर महिलेवर अत्याचार केला. या फिर्यादीवरून पोलिसांनी सुनील कानवडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाटेवाल करीत आहेत.  

Website Title: News atrocities-from-time-to-time-by-luring-the-woman-Sangamner Taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here