Home अहमदनगर बिबट्याने केले तरुणाचे अपहरण, पोलीस व वनविभाग शोध मोहीम सुरु

बिबट्याने केले तरुणाचे अपहरण, पोलीस व वनविभाग शोध मोहीम सुरु

पारनेर: पारनेर तालुक्यातील कोहोकडी येथील एका तरुणाचे रविवारी रात्री बिबट्याने अपहरण केल्याचे धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

सतीश सुखदेव गायकवाड (वय २७) असे या अपहरण केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस व वनविभाग यंत्रणेची शोध मोहीम सुरु आहे. सोमवारी दुपारपर्यंत तपास लागलेला नव्हता.

कोहोकडी येथील सतीश सुखदेव गायकवाड हा तरुण रविवारी रात्री शिरूर येथून कोहोकडी फाटा येथे आला होता. त्यानंतर तो घरी आलाच नसल्याने कुटुंबातील व्यक्तींनी पोलिसांना फोन केला. सहायक पोलीस निरीक्षक राजेश गवळी, भालचंद्र दिवटे आणि सहकारी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी शोध घेतला त्यावेळी त्यांना फाट्याजवळ सतीशची गाडी रोडला पडलेली दिसली. तिथे बिबट्याचे पंजाचे निशाण आढळून आले. त्याचबरोबर थोड्या अंतरावर बूट पडलेला होता. मोबाईल देखील चालू अवस्थेत आढळून आला. बुटाशेजारी जमिनीवर बिबट्याचे पंजाचे ओरखाडे दिसून आले.

पोलिसांनी वनविभागाला माहिती देऊन बोलावून घेतले आहे. रात्रीपासून वनविभाग व पोलीस यंत्रणा शोधाशोध करीत आहे. मात्र तो तरुण अजून आढळून आलेला नाही.

Website Title: News Young man abducted by leopard

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here