अहमदनगर जिल्ह्यातील आज आठ जण करोनामुक्त
Coronavirus/अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील आठ जण आज बरे होऊन घरी गेले आहेत. ते आज करोनामुक्त झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यामध्ये संगमनेरमधील ३, नगर शहरातील ०१, राहतामधील ०२, शेवगावमधील ०१ आणि कोपरगाव येथील ०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यात करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २०६ झाली आहे अशी माहिती नोडल अधिकारी डो. बापूसाहेब गाडे यांनी दिली आहे.
जिल्ह्यासाठी दिलासादायक म्हणजे करोना एकूण रुग्ण संख्येमध्ये ८० टक्के बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात एकूण करोना बाधित संख्या २५८ आहे तर करोनामुक्त झालेल्यांची संख्या २०६ आहे त्यामुळे हे प्रमाण ८० टक्के आहे असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांना मागील काही दिवसांपासून काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. मागील काही आठवड्यात करोना रुग्णांची संख्या वाढत चालली होती.
Website Title: Coronavirus Ahmednagar Eight corona free today