Home मनोरंजन सिनेसृष्टी हादरली! ‘या’ दिग्गजाची आत्महत्या, देवदास’, ‘लगान’ अशा  सुपरहिट सिनेमांचा…..

सिनेसृष्टी हादरली! ‘या’ दिग्गजाची आत्महत्या, देवदास’, ‘लगान’ अशा  सुपरहिट सिनेमांचा…..

Art Director Nitin Desai Suicide:  कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.

Nitin Desai Suicide

नितीन देसाई:  सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.  देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी हादरली आहे.

त्यांनी वयाच्या 58 व्या वर्षी आपले आयुष्य संपवलं आहे. नितीन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते.

नितीन देसाई यांनी अनेक सुपरहिट हिंदी सिनेमांचे सेट उभारले होते.’1942 अ लव्ह स्टोरी’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘माचिस’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’ या सुपरहिट सिनेमाचं त्यांनी कला दिग्दर्शन केलं होतं. नितिन देसाई हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतलं मोठं नाव होतं.

नितीन देसाई यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. स्टुडीओतील कर्मचाऱ्यांना आत्महत्या केल्याचं कळल्यानंतर त्यांनी लगेचच स्थानिक पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. आता पोलीस अधिक  तपास करत आहेत. नितिन देसाई यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

Web Title: Nitin Desai Suicide

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here