भावाला फोन करुन म्हणाली मी उद्या गावी येतेय, पण गावी पोहचलीच नाही, दोन दिवसांनी थेट
गावी जाण्यासाठी निघालेल्या 24 वर्षीय तरुणीचा संशयास्पदरित्या मृतदेह (Dead body) आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दापोलीहून चिपळूण येथे आपल्या गावी जाण्यासाठी निघालेल्या 24 वर्षीय तरुणीचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दापोलीतील दाभोळ खाडी परिसरात तरुणीचा मृतदेह सापडला आहे. याप्रकरणी दाभोळ पोलीस ठाण्यात सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयत तरुणी दापोली येथे स्टेट बँकेत कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होती. मृत तरुणी ही मूळची चिपळूण तालुक्यातील ओमळी गावची रहिवासी होती. मात्र नोकरीनिमित्त ती दापोलीत राहत होती. शनिवारी-रविवारी बँकेला सुट्टी असायची. त्यामुळे ती दोन दिवस गावी आपल्या घरी जायची. नेहमीप्रमाणे या शुक्रवारी रात्री तिने भावाला फोन करुन उद्या सकाळी गावी येत असल्याचे सांगितले. मात्र ती घरी पोहचलीच नाही. घरच्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, फोन लागत नव्हता.
अखेर घरच्यांनी दापोली पोलीस ठाण्यात धाव घेत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तरुणीचा शोध सुरु केला. मात्र ती कुठेही सापडली नाही. अखेर दाभोळ खाडी परिसरात तिचा मृतदेह आढळून आला. तरुणीचे शेवटचे लोकेशन खेड असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर दाभोळ खाडी परिसरात मृतदेह तरंगताना आढळला.
तरुणीने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला?, कोणत्या कारणातून झाला?, तरुणीसोबत नेमकं काय घडलं? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवाल आणि तपासानंतरच तरुणीच्या मृत्यूचे रहस्य समोर येईल असे पोलिसांनी सांगितले.
Web Title: the dead body of a 24-year-old girl was found suspiciously
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App