Home कोपरगाव संगमनेरात  घरफोडी, कोपरगावात  सात दुकाने फोडली

संगमनेरात  घरफोडी, कोपरगावात  सात दुकाने फोडली

Sangamner News: चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजा तोडून कपाटातील ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून  (Theft) नेल्याची  घटना.

Theft in Sangamner, seven shops in Kopargaon

संगमनेर: चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजा तोडून कपाटातील ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले ६७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची  घटना घुलेवाडी गावच्या हद्दीत असलेल्या विधि महाविद्यालयाच्या पाठीमागील आराधना कॉलनी येथे घडली. हा प्रकार ३१ जुलै सकाळी ८:३० वाजता समोर आला आहे. याबाबत  लता आबाजी गोडे यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सोमवारी मध्यरात्री  कोपरगाव शहरातील येवला रोड परिसरात असलेली सात दुकाने चोरट्याने फोडून रोख रक्कम व इतर वस्तू चोरून नेल्याची चर्चा आहे. याप्रकरणी केवळ एकाच दुकानदाराने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या व्यापारी धर्मशाळेसमोर तीन दिवसांपूर्वी दोन दुकाने फोडून चोरी झाल्याची घटना घडली होती. याच परिसरातून एक दुचाकीही चोरट्यांनी पळविली. याबाबत पोलिस ठाण्यात कुठलीही तक्रार दाखल नाही. सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी येवला रोड परिसरातील सात दुकाने फोडल्याची चर्चा मंगळवारी दिवसभर कोपरगाव शहरात होती; परंतु प्रदीप शिवनाथ साखरे (रा. जानकी विश्व, कोपरगाव) या एकमेव व्यापाऱ्याने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. साखरे यांच्या फिर्यादीनुसार येवला रोडवरील साखरे बिल्डिंग मटेरिअल या दुकानाच्या मागील बाजूस असलेला पत्रा कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर सामानाची उचकापाचक करून काउंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले ५८ हजार रुपये रोख व एक पेन ड्राइव्ह चोरट्यांनी चोरून नेला.

Web Title: Theft in Sangamner, seven shops in Kopargaon

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here