Home संगमनेर संगमनेर: गौण खनिजाची मालकांना नोटीसा, दंड भरा अन्यथा….

संगमनेर: गौण खनिजाची मालकांना नोटीसा, दंड भरा अन्यथा….

Sangamner:   57 स्टोन क्रेशर मालकांना गौण खनिजाची खनिजाचे बेकायदेशीर उत्खनन केल्याप्रकरणी 765 कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला.

Notice to owners of minor minerals, pay penalty or else

संगमनेर: तालुक्यातील 57 स्टोन क्रेशर मालकांना गौण खनिजाची खनिजाचे बेकायदेशीर उत्खनन केल्याप्रकरणी 765 कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. सदर दंड आकारून पाच महिन्यानंतर या स्टोन क्रेशर मालकांनी दंडाची रक्कम न भरल्याने प्रभारी तहसीलदारांनी पुन्हा नोटीस बजावली आहे. पंधरा दिवसांत दंडाची रक्कम न भरल्यास स्थावर व जंगम मालमत्तेवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा तहसीलदारांनी दिल्याने या स्टोन क्रेशरमालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर स्टोन क्रेशर चालू होते. शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवून व्यवसाय सुरू होता. याबाबत महसूल अधिकार्‍यांकडे वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या होत्या. संगमनेर तालुक्यातील स्टोन क्रेशर मालक हे राजकीय पक्षांचे पदाधिकारी असल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जात नव्हती.

5 डिसेंबर 2022 रोजी तत्कालीन तहसीलदार अमोल निकम यांनी पत्रकार परिषद घेऊन या अवैध उत्खनन करणार्‍या स्टोन क्रेशर धारकांची माहिती दिली होती. त्यामध्ये, 57 स्टोन क्रेशर धारकांना 765 कोटी रुपयांचा दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला होता. यामधील गाडे व पालवे हे दोन स्टोन क्रेशरधारक यांनी हायकोर्टात धाव घेतली व तहसीलदारांचा दंडाचा आदेश रद्द करून फेर चौकशी करण्याचा आदेश केला.

संगमनेर महसूल विभागावर विश्वास न दाखवता शिर्डी व श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकार्‍यांनी स्टोन क्रेशर धारकांची 20 ऑक्टोबर 2022 रोजी ए. टी. एस. ने मोजणी केली होती. त्यानंतर अवैध उत्खनन केलेल्या स्टोन क्रेशर धारकांवर कारवाईची प्रक्रीया सुरू झाली. त्यानुसार शिर्डी व श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी यांनी 11 नोव्हेंबर 2022 रोजी चौकशी अहवाल जिल्हाधिकार्‍यांना सादर केला. तत्कालीन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी अतिरिक्त उत्खनन झालेल्या स्टोन क्रेशरचालकांवर कारवाईचे आदेश दिले. संगमनेरचे महसूल विभाग या सर्व गोष्टी खुलेआम सुरू असताना ही महसुल अधिकार्‍यांनी जाणीवपूर्वक केलेल्या दुर्लक्षामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावा लागले. मात्र, कोणीतरी तक्रारदार झाले तेव्हा खडबडून जागे झालेल्या महसुल प्रशासनाने या सर्व अवैध व्यवसायला कोट्यवधी रुपयांचा दंड केला.

संगमनेर तालुक्यात गेली अनेक वर्षांपासून स्टोन क्रेशर व्यवसाय सुरू आहे. या व्यवसायला मागील काही काळात उत्पादनाचा सोर्स म्हणून याकडे पाहिले गेले. त्यातच तालुक्यासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या राज्य तसेच राष्ट्रीय महामार्गांच्या कामामुळे या व्यवसियकांचे महत्व अधिकच वाढले होते. राजकीय कार्यकर्त्यांनसाठी हा व्यवसाय एक प्रतिष्ठेचा झाला होता. याच राजकीय कार्यकर्त्यांनी प्रशासनातील अधिकार्‍यांशी संगनमत करून गौण खनिज पुरवण्यासाठी आपले लागे बांधे निर्माण केले होते.

याच स्टोन क्रेशर चालकांपैकी अनेकजण सरकारी कामांचे ठेके ही घेणारे असल्यामुळे यांनी आपल्या व्यवसयाची साधनसामग्री निर्माण करून या व्यवसयात संगमनेरात अर्थकारणाचे आपले प्रस्थ निर्माण केले. पण, हे सर्व करत असताना नियम धाब्यावर बसवून हे स्टोन क्रेशर अवैधरित्या दिवस रात्र सुरू होते. हे आता कारवाईमुळे उघडकीस आले आहे. ही सर्व परिस्थिती असली तरी गौण खनिजाच्या व्यवसयातील राजकीय सोनेरी चेहरे संगमनेरात उघडे पडले आहे.

स्टोन क्रेशर मालक आता कोणता निर्णय घेतात याकडे अनेकांचे लक्ष लागून आहेत. दंडाची रक्कम न भरल्यास त्यांची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त होण्याची शक्यता आहे.

Web Title: Notice to owners of minor minerals, pay penalty or else

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here