Home अहमदनगर अल्पवयीन मतीमंद मुलीवर अत्याचार, अहमदनगरमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना

अल्पवयीन मतीमंद मुलीवर अत्याचार, अहमदनगरमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना

Ahmednagar Crime:  11 वर्षीय अल्पवयीन मतीमंद मुलीवर 57 वर्षीय व्यक्तीने अत्याचार (Abuse) केल्याची घटना.

Ahmednagar Abuse of a mentally retarded minor girl

अहमदनगर: नगर शहरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. एका 11 वर्षीय अल्पवयीन मतीमंद मुलीवर 57 वर्षीय व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.  याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख शकील सजन (रा. कुंभारगल्ली, बागडपट्टी, ता. जि.नगर) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला पोलिसांनी रात्रीच अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी रात्री सोडआठच्या सुमारास बागडपट्टी येथे अल्पवयीन, मतीमंद मुलीवर आरोपीने बळजबरीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना काही महिलांनी पाहिली. त्यांनी तात्काळ मुलीची आई व शेजारील लोकांना सांगितल्याने अनुचित प्रकार टळला. काही नागरिकांनी पोलिसांना कळविल्याने पोलीसही घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी आरोपीला अटक केली. पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिल्यावर अत्याचार करणार्‍यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या.

WebTitle: Ahmednagar Abuse of a mentally retarded minor girl

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here