कालिचरण महाराजांविरोधात नगरमध्ये गुन्हा दाखल
Ahmednagar Crime News: शहरातील दिल्लीगेट येथे झालेल्या जनआक्रोश सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कालिचरण महाराज यांच्याविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
अहमदनगर : शहरातील दिल्लीगेट येथे झालेल्या जनआक्रोश सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कालिचरण महाराज उर्फ अभिजित धनंजय सराग (रा. अकोला) यांच्याविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. ९) करण्यात आली आहे.
याबाबत पोलिस हवालदार अजय गव्हाणे यांनी फिर्याद दिली आहे. नगर शहरातून १४ डिसेंबर २०२२ रोजी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला प्रारंभ झाला होता. हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, माळीवाडा, पंचपीर चावडी, आशा टॉकीज चौक, माणिक चौक, भिंगारवाला चौक, कापड बाजार, चितळे रोड मार्गे दिल्लीगेट येथे पोहोचला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. त्यावेळी कालिचरण महाराज यांनी मार्गदर्शन करताना अक्षेपार्ह विधान केले होते. याबाबत पोलिसांनी सरकारी अभियोक्ता यांच्याकडून मार्गदर्शन मागविले होते. ते मंगळवारी पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर भादंवि कलम १५३ (अ) व ५०५ (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Crime has been registered in the city against Kalicharan Maharaj
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App