मोबाइल पाहण्यावरून वडिलांनी खडसावले, बारावीतील मुलीने केली आत्महत्या
Pune: वडिलांनी खडसावल्यामुळे बारावीतील युवतीने इमारतीच्या छतावरून उडी मारून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना.
पुणे: वडिलांनी खडसावल्यामुळे बारावीतील युवतीने इमारतीच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील घोडेगाव परिसरात घडली.
भूमी सोनवणे (वय १९, रा. घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. भूमी बारावीत शिकत होती. तिचे वडील व्यावसायिक आहेत. बारावीचे वर्ष असल्याने सारखा मोबाइल पाहू नको, अभ्यासावर लक्ष केंद्रित कर, असे तिला वडिलांनी सांगितले होते. वडील ओरडल्याने भूमी रात्री इमारतीच्या छतावर गेली. तिने छतावरून उडी मारून आत्महत्या केली. सकाळी भूमी इमारतीच्या आवारात गंभीर जखमी अवस्थेत पडल्याचे सोनवणे कुटुंबीयांनी पाहिले. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास घोडेगाव पोलीस करीत आहे.
Web Title: 12th grade girl commits suicide after her father scolded her
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App