Home नाशिक सिन्नरमध्ये  स्वाईन फ्ल्यूमुळे एकाचा मृत्यू; दोघांची प्रकृती गंभीर

सिन्नरमध्ये  स्वाईन फ्ल्यूमुळे एकाचा मृत्यू; दोघांची प्रकृती गंभीर

Nashik death due to swine flu:  स्वाइन फ्ल्यूमुळे एकाचा मृत्यू तर दोन रुग्णांवर उपचार सुरू. 

One death due to swine flu in Sinner

नाशिक: नाशिकमध्ये पुन्हा एकदा स्वाईन फ्ल्यूचा धोका वाढला आहे. स्वाइन फ्ल्यूमुळे एकाचा मृत्यू तर दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सिन्नरमधील एका महिलेचा स्वाइन फ्ल्यूमुळे मृत्यू झालेला आहे. तर नाशिक शहरातील दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

उपचार घेत असलेल्या असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. रुग्णांच्या संपर्कातील लोकांचे स्वॅब नमुने घेवून तपासणी करणार येणार आहे. डेंग्यूचा धोका कमी झाल्यानंतर स्वाइन फ्ल्यूचा धोका वाढल्यानं आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे.

मागील वर्षी नाशिक शहरामध्ये डेंगूचे थैमान माजले होते. तर यंदा आता नागरिकांसमोर स्वाईन फ्ल्यूचं नवं संकट उभं ठाकले आहे. एकीकडे शहरात उन्हाचा पारा वाढत आहे. शहरामध्ये तापमानाने सोमवारी चाळीशी पार केली होती. त्यामुळे तापाच्या रूग्णांमध्ये मोठी भर पडत आहे. आता स्वाईन फ्ल्यूमुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला ६३ वर्षांची होती. त्यामुळे आता नागरिकांच्या चिंतेमध्ये मोठी भर पडत आहे.

नाशिक शहरामध्ये स्वाईन फ्लूचे दोन रुग्ण आढळल्यानंतर या दोन्ही रूग्णांचा अहवाल पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. या रूग्णांमध्ये एक महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. या दोन्ही रूग्णांचे रिपोर्ट्स पॉझिटीव्ह आल्यानंतर आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे.

Web Title: One death due to swine flu in Sinner

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here