Home महाराष्ट्र नोकरी सोडत नाही म्हटले म्हणून पत्नीचा चिरला गळा

नोकरी सोडत नाही म्हटले म्हणून पत्नीचा चिरला गळा

Breaking News | Solapur Crime: नोकरी सोडणार नाही म्हटल्याने रागाच्या भरात पतीने पत्नीचा चाकूने गळा चिरून खून केला आणि पतीनेही गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न.

Murder Case wife's throat was cut for saying that she would not quit her job

अकलूज | जि. सोलापूर: नोकरी सोडणार नाही म्हटल्याने रागाच्या भरात पतीने पत्नीचा चाकूने गळा चिरून खून केला आणि पतीनेही गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी अकलूज येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मैनुद्दीन कासम शेख (५५, रा. सांगोला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी आफ्रीन फिरोज काझी (३७) हिच्याशी तिचा नवरा फिरोज हुकमुद्दीन काझी (४५, रा. अकलूज) याने ‘तू सांगोला येथे राहू नको, तेथील नोकरी सोडून देऊन तू अकलूजला राहायला ये,’ असे म्हणून भांडण काढले. यावर मुलीने नोकरी सोडून अकलूजला येणार नाही म्हटल्याने चिडून त्याने चाकूने भोसकून तिचा खून केला. त्यानंतर त्याने त्याच्या घरी जाऊन गळफास घेण्याचा प्रयत्न केला.

पत्नीचा खून करून पती पोलिस ठाण्यात

पत्नीचा खून करून पती थेट पोलिस ठाण्यात हजर झाला. ही घटना सोमवारी सोलापुरातील स्वागतनगरात उघडकीस आली. यास्मीन सैफन शेख (४०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा खून करून पतीने स्वतःला पोलिस ठाण्यात जाऊन अटक (Arrested) करून घेतली.

Web Title: Murder Case wife’s throat was cut for saying that she would not quit her job

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here