Home अहमदनगर अहमदनगर: फोनवर बोल, नाहीतर…..  महिलेचा विनयभंग, आरोपी गजाआड

अहमदनगर: फोनवर बोल, नाहीतर…..  महिलेचा विनयभंग, आरोपी गजाआड

Breaking News | Ahmednagar:  ‘तू माझ्यासोबत फोनवर बोलत जा, नाहीतर मी तुझी बदनामी करेल,’ असे म्हणून आरोपीने एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना. महिलेचा विनयभंग करणाऱ्याला अटक.

Talk on the phone, or else….. Woman molestation

राहुरी : ‘तू माझ्यासोबत फोनवर बोलत जा, नाहीतर मी तुझी बदनामी करेल,’ असे म्हणून आरोपीने एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. या घटनेतील आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली.

या घटनेतील आरोपी तरुणाने काही दिवसांपूर्वी एका महिलेला फोनवर बोलली नाही तर बदनामी करण्याची धमकी दिली होती. यानंतर पीडित महिलेने त्याच्याशी फोनवर बोलण्यास नकार दिला. या कारणावरून आरोपीने पीडित महिलेचा विनयभंग केला. तसेच तिला शिवीगाळ दमदाटी करून तिच्या गळ्यातील दोन तोळ्याचे गंठण काढून घेतले होते.

या घटनेबाबत पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी साईनाथ भाऊसाहेब भुजबळ (रा. गंगापूर, ता. राहुरी) याच्यावर राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील पिंगळे, पोलिस हवालदार सोमनाथ जायभाय, आवारे, पोलिस नाईक देवीदास कोकाटे, रवी पवार आदी पोलिस पथकाने आरोपी साईनाथ भाऊसाहेब भुजबळ याला रविवारी (दि. १४) रात्री ताब्यात घेऊन गजाआड केले. आरोपीला राहुरी येथील न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाकडून त्याला ३ दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेचा पुढील तपास हवालदार सोमनाथ जायभाय करीत आहेत.

Web Title: Talk on the phone, or else….. Woman molestation

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here