Home क्राईम पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर बलात्कार करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर बलात्कार करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा

Breaking News | Pune Crime: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर बलात्कार (Raping), तसेच धमकावून गर्भपात केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एका पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना.

Crime against police sub-inspector for raping young woman 

पुणे : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर बलात्कार, तसेच धमकावून गर्भपात केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एका पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षकाने तरुणीला धमकावून जामखेड परिसरातील एका रुग्णालयात गर्भपात केल्याचे तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

किरण माणिक महामुनी (वय ३८, रा. नागपूर) असे गुन्हा दाखल केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत माहिती अशी की, तक्रारदार तरुणी पोलीस भरतीची तयारी करत आहे. महामुनीशी तिची ओळख झाली होती. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्यावर बलात्कार केला. महामुनीने तिच्यावर शिवाजीनगर भागातील घरी वेळोवेळी बलात्कार केला. तरुणी गर्भवती झाली. त्यानंतर त्याने तिला नगर जिल्ह्यातील (Ahmednagar) जामखेड परिसरात असलेल्या एका रुग्णालयात नेले. तेथे तिला धमकावून गर्भपात केला, असे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. तरुणीने नुकतीच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक काळे  करत आहेत.

Web Title: Crime against police sub-inspector for raping young woman 

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here