Home औरंगाबाद बदनामी धमकी, नववीतील विद्यार्थिनीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

बदनामी धमकी, नववीतील विद्यार्थिनीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Breaking News | Vaijapur: सोशल माध्यमावर बदनामी करण्याची धमकी दिल्याने निराश झालेल्या नववीतील विद्यार्थिनीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना.

student of class 9 committed suicide by jumping into a well

वैजापूर : सोशल माध्यमावर बदनामी करण्याची धमकी दिल्याने निराश झालेल्या नववीतील विद्यार्थिनीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथे घडली. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रोहित संजय साळवे (रा. चिंचडगाव) व पीयूष मिन्नाथ घुले (रा. जांबरगाव) अशी आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, १५ वर्षीय पीडित मुलगी शहरातील एका शाळेत नववीत शिकत होती. शाळेतून जाता-येताना दोघेजण तिची नेहमी छेड काढत.

या प्रकार तिने आपल्या भावाला सांगितल्यानंतर भावाने आरोपींना समज दिली. त्यावेळी रोहित याने आणखी एका अनोळखी व्यक्तीला सोबत घेत त्यांना मारहाण केल्याचे समोर आले. मात्र तरीही आरोपी

मुलीला भेटण्यासाठी आग्रह धरत होते. दरम्यान, सदर मुलगी शाळेतून घरी येत असताना आरोपी पीयूष याने तिला ‘रोहितला व्हिडिओ कॉल कर नाही तर तुझ्या भावाला मारून टाकू,’ अशी धमकी दिली.

या धमकीला घाबरून तिने मामाच्या फोनवरून रोहितला व्हिडिओ कॉल केला. त्यावेळी रोहितने स्क्रीनशॉट काढले व त्यानंतर मुलीला भेटायला ये नाही तर तुझे स्क्रीनशॉट सोशल माध्यमावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तेव्हापासून ती नैराश्यात होती. यातून तिने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याचे समोर आले. दरम्यान, मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्या नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. आरोपींविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.

Web Title: student of class 9 committed suicide by jumping into a well

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here